घरांच्या नोंदणी करण्यासाठी महाआवास नावाने नवे ऍप…

मुंबई दि १० — प्रधानमंत्री आवास योजनेसह सर्व घर योजनांसाठी नोंदणी करण्यासाठी महाआवास नावाने अँप येत्या तीन महिन्यात विकसित करण्यात येत आहे, त्यावर नोंदणी करण्यात आलेल्या घरांची लॉटरी दर आठवड्यात काढण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना देवयानी फरांदे उपस्थित केली होती, त्यावर प्रवीण दटके यांनी उपप्रश्न विचारले. नाशिक मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबत विधानपरिषद सभापतींनी दिलेल्या निर्देशांपेक्षा वेगळी भूमिका मनपा आयुक्तांनी घेतली त्यामुळे पेच निर्माण झाला आहे, मात्र त्यातून मार्ग काढला जाईल असं मंत्री म्हणाले.ML/ML/MS