महामार्ग दुभाजकावर धडकलेली गाडी बाहेर काढताना सहा जणांचा मृत्यू

 महामार्ग दुभाजकावर धडकलेली गाडी बाहेर काढताना सहा जणांचा मृत्यू

बीड दि २७– रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गढी येथील कारखान्यासमोर गेवराई येथील दीपक आतकरे यांच्या मुलाचा एक्स यू व्ही वाहन डिव्हायडरवर आदळून किरकोळ अपघात झाला होता. डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी आतकरे आणि त्यांचे काही सहकारी घटनास्थळी आले असता, अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली.

या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर काही वेळातच गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले .ML.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *