आता पुन्हा होणार कोरोना नमुन्यांचे Genome Sequencing
मुंबई, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये सुरू असलेल्या कोरोनाच्या उद्रेकानंतर आता देशातही सावधगिरीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता राज्य सरकार कोरोना नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग करणार आहे. जगभरातील वाढता कोरोना संसर्ग पाहता केंद्रांना राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या होत्या.
याबाबत बोलताना महाराष्ट्र आरोग्य विभागाचे (Maharashtra Health Department) वरिष्ठ अधिकारी संजय खंदारे (Sanjay Khandare) यांनी पुढील माहिती दिली आहे. ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) सल्ल्यानुसार, राज्यातील कोरोना (Sample of Corona Patients) रुग्णांचे सर्व नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी (Genome Sequencing) मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) येथील प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. सध्या, राज्यात सुमारे 100 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्यामुळे आम्ही सर्व पॉझिटिव्ह नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवू.’
दरम्यान देशात कोरोना चा संभाव्य वाढता प्रभाव लक्षात घेऊन केंद्र सरकारशी समन्वय साधून राज्यात टास्क फोर्स तयार करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली , अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही आता सावध झाले असून देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर नीति आयोगाचे सदस्य डॉ. वी.के. पॉल यांनी चिंता करण्याची गरज नसल्याचं म्हटलं.
देशपातळीवर सुरू असलेल्या भारत-जोडो यात्रे दरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना यात्रे दरम्यान कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. याचे उल्लंघन झाल्यास यात्रा स्थगित करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
SL/KA/SL
21 Dec. 2022