‘गेला माधव कुणीकडे’, १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या भेटीला

 ‘गेला माधव कुणीकडे’, १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या भेटीला

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रशांत दामले यांची प्रमुख भूमीका असलेले ‘गेला माधव कुणीकडे’ हे धमाल विनोदी नाटक आता तब्बल १९ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले आहे. ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने ‘ब्रेक’ घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा शुभारंभ १५ जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी ४.००वा. होणार आहे. तिकीट विक्रीचा शुभारंभ १ जून रोजी फक्त ‘तिकीटलाय’अॅप वर सुरु होईल.

दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी या नाटकात आहे. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. नाटकात प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.रसिकांचं अफाट प्रेम लाभलेलं ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक मायबाप रसिकांसाठी’ पुन्हा रंगभूमीवर आणताना अतिशय आनंद होत असल्याचे अभिनेता प्रशांत दामले यांनी सांगितले आहे.

SL/ML/SL

27 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *