पुण्यात जीबीएस बाधित असलेल्या तिसऱ्या रूग्णाचा मृत्यू, रूग्ण वाढले, २० जण व्हेंटिलेटरवर
पुणे आणि परिसरात गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) बाधित आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नांदेडगाव येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचे ससून रुग्णालयात निधन झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती गंभीर होत गेल्याने तिचा मृत्यू झाला. ही महिला जीबीएस बाधित रुग्णांपैकी एक होती. पुण्यातील नांदेडगावात अनेक रुग्ण या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील हा तिसरा मृत्यू असून, राज्यातील हा चौथा मृत्यू आहे.