आखेर गीता आणि योगिता गवळी पराभूत

 आखेर गीता आणि योगिता गवळी पराभूत

मुंबई, दि १८
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 207 आणि प्रभाग क्रमांक 212 येथे अखिल भारतीय सेनेच्या वतीने गीता गवळी आणि योगिता गवळी या रिंगणात होत्या. या निवडणुकीमध्ये कोण भाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होतं. कारण या ठिकाणी माजी अंडरवर्ल्ड डॉन, माजी आमदार अरुण गवळी यांनी आपल्या दोन्ही मुलींना निवडून आणण्यासाठी जंग जंग पिंजून काढला होता. गवळी यांनी दोन्ही मुलींच्या प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात हिरगिरीने भाग घेतला होता. रोड शो दरम्यान गवळी यांना पाहण्यासाठी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. परंतु या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये झाले नाही. प्रभाग क्रमांक 207 येथे गवळी यांच्या धाकट्या कन्या योगिता गवळी या निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी उभा राहिला होत्या. योगिता गवळी या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने त्यांना प्रभागाचा अंदाज आला नाही. योगिता गवळी यांनी त्यांच्या करा फाउंडेशनच्या माध्यमातून विभागामध्ये काम केले होते. तसेच त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना पॅड वुमन देखील समजले जाऊ लागले होते. त्यांनी महिलांसाठी विशेष असे अनेक कॅम्प राबवून महिलांचे विविध प्रश्न सोडवले होते. त्यांचा सामना भारतीय जनता पार्टीचे नेते स्थानिक नगरसेविका सुरेखा लोखंडे यांचे पती भाजपा नेते रोहिदास लोखंडे यांच्याशी झाला. रोहिदास लोखंडे यांचे प्रवाहामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काम असून त्यांचा जनसंपर्क फार दांडगा आहे. तसेच त्यांचे कार्यालय 24 तास लोकांसाठी उघडे असते. त्यांनी प्रभागांमध्ये आपले मूळ फार घट्ट पणे रुजवले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असो, जातीचा दाखला असो त्याचप्रमाणे विविध कामे आपल्या प्रभागांमध्ये केली होती. त्याचप्रमाणे त्यांची पत्नी स्थानिक नगरसेविका असल्यामुळे त्यांच्याकडे निधी होता हा निधी त्यांनी संपूर्ण प्रभागामध्ये खर्च केला होता त्याचा परिणाम त्यांना विजयी होण्यासाठी नक्कीच झाला. तसेच त्यांचा विजय नक्की होणार अशी विभागात लोकांमध्ये खात्रीशीर चर्चा रंगली होती. त्याचप्रमाणे लोखंडे यांचा विजय झाला.
त्याचप्रमाणे गवळी यांची मोठी कन्या गिता गवळी या प्रभाग क्रमांक 212 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्या तीन टर्म नगरसेविका असून 2007 पासून त्यांनी प्रभागांमध्ये आपली पकड मजबूत केली होती. तसेच त्यांनी प्रभागांमध्ये विविध कामे केले असल्याने त्यांचा विजय नक्की होता अशी प्रभागात चर्चा होती परंतु मुस्लिम बहुल आसलेल्या या विभागांमध्ये मुस्लिम नागरिकांनी एक गट्टा मतदान हे समाजवादी पार्टीच्या अमरीन अब्राहणी या महिलेला दिले असल्याने त्यांचा विजय झाला. इथं गवळी यांचे प्रभागात काम असून देखील त्यांचा पराभव झाल्याबाबत मतदारसंघात नागरिकांची चर्चा रंगली. शेवटी मतदारसंघ राजा असून तो कोणाच्या पायऱ्यात मत टाकेल आणि कोणाला विजयी करेल हे काही आपण सांगू शकत नाही.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *