संततधार पावसाने, पुराने बारा गावांचा संपर्क तुटला; गोसेखुर्द धरणाचे ३३ गेट उघडले

चंद्रपूर दि ९ :–चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे शिवार जलमय झाले असून, नाल्यांना पूर आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात रपटे वाहून गेल्याने आणि पुलांवरून पाणी वाहत असल्याने १२ गावांचा संपर्क तुटला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ गेट उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या पावसामुळे खुल्या खाणीतील कोळसा उत्पादनावरही अनिष्ट परिणाम झाला आहे.
जिल्ह्यातील जिवती, कोरपना, राजुरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा व पोंभुर्णा तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ML/ML/MS