गौतमी पाटीलचं “नऊवारी” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल*

 गौतमी पाटीलचं “नऊवारी” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल*

मुंबई, दि १२

आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. सानिधप ओरिजनल्स प्रस्तुत गौतमी पाटीलचं “नऊवारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झाल आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याची निर्मिती डॉ. विवेक इंगळे यांनी केली आहे. सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या मधुर आवाजाची सुंदर साथ या गाण्याला लाभली आहे. तसेच पंकज वारूंगसे यांनी या गाण्याची गीतरचना आणि संगीत केले आहे. मनीष शिंदे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.

या गाण्याचे दिग्दर्शक मनिष शिंदे या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी म्हणाले, “हे गाणं पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हा नुसती लावणी न सादर करता आपण त्या मागे एखादी कथा सांगावी असा मी विचार केला. नऊवारी साडी म्हणजे आपली परंपरा, राजा महाराजांच्या काळापासून स्त्रीया नऊवारी साडी परिधान करत आल्या आहेत. त्या काळात ज्या लढवय्या स्त्रीया होत्या त्या नऊवारी साडी परिधान करायच्या जेणे करून त्यांना घोडेस्वारी करणं, डोंगरकडा सर करणं सोप्प जायचं. त्यामुळे मी ठरवलं की ही लावणी नसून एक योजना आहे. असं गाणं चित्रीत करू. दोन दिवस गाण्याच्या आर्ट डिरेक्शनचं काम झालं त्यानंतर आम्ही पुण्यातील विठ्ठल वाडी, मुळशी गावातील घनदाट जंगलात या गाण्याचा सुरूवातीचा भाग चित्रीत केला. त्यासाठी गाण्याच्या संपूर्ण टीमने  सर्व लाइट्स, कॅमेरा, इतर सामान त्या लोकेशन पर्यंत पोहोचवलं. सर्व कलाकार आणि टीमने खूप मेहनत घेतली आहे

नऊवारी गाण्याचे निर्माते डॉ. विवेक इंगळे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतात, “नऊवारी या गाण्याची निर्मिती करताना माझा अनुभव अतिशय भावनिक होता. सर्वात पहिले जेव्हा गीतकार-संगीतकार पंकज वारूंगसे यांनी मला हे गाणं ऐकवलं, तेव्हा त्या शब्दांचा अर्थ, त्यामागची भावना आणि त्यातली ताकद माझ्या मनाला थेट भिडली. त्या क्षणीच मला जाणवलं की हे गाणं फक्त बनवायचं नाही, तर ते जगासमोर पोहोचवायचं आहे. गाण्याची धून तयार झाल्यानंतर गायिका म्हणून आमच्या मनात सर्वप्रथम गायिका बेला शेंडे यांचं नाव आलं. आम्ही त्यांना गाणं ऐकवलं आणि त्यांनी ते तितक्याच प्रेमाने स्वीकारलं. त्यानंतर गाण्याचं रेकॉर्डिंग अतिशय सुंदर पद्धतीने पार पडले. मनिष यांनी हे गाणं ऐकून सांगितलं की नऊवारी फक्त एक लावणी नसून शिवकालीन गुप्तचर संघटनेची एक सखोल योजना म्हणूनही ती मांडता येते. त्यांनी ही दृष्टी प्रत्यक्ष पडद्यावर जिवंत केली. के. विजय यांनी अप्रतिम छायाचित्रण केलं आहे आणि नृत्य दिग्दर्शन अविनाश नलावडे यांनी ताकदीने साकारलं आहे. सेटवरील सर्व कलाकार आणि तांत्रिक कार्यसंघाने नऊवारी हे फक्त एक गाणं नाही तर एक अनुभव आहे, हे मनापासून जाणवलं. आज त्या भावनेचा अनुभव प्रेक्षकही आपल्या मनात साठवत आहेत. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पाहून खूप आनंद होत आहे. तुम्ही सर्वांनी हे गाणं नक्की बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रीया कमेंट्सद्वारे जरूर कळवा.”

Link – https://youtu.be/FmStZXRv5t4?si=SLVFKt1AwgmZoQsa

KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *