गौतम अदानी अमेरिकेत करणार ८४ हजार कोटींची गुंतवणूक

आशियातील श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयानंतर मोठी भेट दिली आहे. ही भेट तब्बल 84 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची आहे. याची घोषणा स्वतः अदानी यांनी त्यांच्या X हँडलवरुन केली आहे. निवडणुकीतील विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करताना अदानी यांनी येत्या काही दिवसांत अमेरिकेत 10 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 84 हजार कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे.