राज्यात सर्वत्र भक्तीभावाने गौरीपूजन आणि नैवेद्य…

 राज्यात सर्वत्र भक्तीभावाने गौरीपूजन आणि नैवेद्य…

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गौरी आगमनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात ज्येष्ठागौरी पूजन केले जाते. गौरीच्या मुखवट्यांना विविध अलंकारांनी नटवले जाते . काकडीच्या पिवळ्या धम्मक फुलांची माळ गौरीला अवश्य अर्पण केली जाते. गौरीची स्थापना श्री गणेशाच्या शेजारी केली जाते. ज्याप्रमाणे गणेशाच्या आगमनानंतर कौड कौतुक केले जाते तसेच कौतुक गौरीचे देखील गोडाधोडाचा नैवेद्य दाखवूनकेले जाते .

काही ठिकाणी गौरीला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची देखील परंपरा आहे. कोकणात गौरीच्या पुढ्यात वैशिष्ट्यपूर्ण असा ओवसा भरण्याची परंपरा आहे. विविध औषधी वनस्पतींच्या पानांनी आणि विविध जिन्नसांनी नटलेला ओवसा गौरी समोर भरला जातो .त्यानंतर हाच ओवसा वडीलधाऱ्यांच्या हाती देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. विदर्भ , उत्तर महाराष्ट्रात गौरीला महालक्ष्मी असेही म्हणतात , एका पिढीतील रूढी परंपरा , चालीरीती , रीतीरीवाज पुढील पिढीकडे सुपूर्द करणे याचे प्रतीक म्हणून हा वसा भरला जातो . उद्या गौरी गणपती विसर्जन केले जाईल.

PGB/ML/PGB
11 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *