गेट वे ऑफ इंडियाला गेले तडे

मुंबई,दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईला भेट देणाऱ्या पर्यंटकांचे आवडते ठिकाण आणि शहरातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या गेट वे ऑफ इंडीया या ऐतिहासिक वास्तूला तडे गेले आहेत. पुरातत्व विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये हे उघड झाले आहे.
शंभरी पार केलेली ही वास्तू समुद्राच्या लाटांचा मारा सहन करत दिमाखात उभ्या असलेल्या वास्तूला तडे गेल्याचे राज्य पुरातत्व विभागाच्या अहवालात समोर आले आहे. त्यामुळं ती इमारत कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं राज्य पुरातत्व विभागाने महाराष्ट्र सरकारकारला गेट वे इंडियाच्या संवर्धनाचा प्रस्ताव मांडला आहे.
पुरातत्व विभागाने ६.९ कोटींचा संवर्धनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. दरम्यान, हा प्रस्ताव अद्याप मंजुर झालेला नाहीये. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेट वे ऑफ इंडियासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन दिलं आहे. लवकरच नुकसान झालेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.
SL/KA/SL’
9 March 2023