गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा !

मुंबई दि १– गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के.विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते आणि महाराष्ट्र सागरी मंडळ अशा दोन्ही बाजूंची सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर जेट्टी प्रकल्पाविरोधातील तिन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत.
या जेट्टी प्रकल्पाचा मार्ग यामुळे मोकळा झाला असून या प्रकल्पामुळे मुंबईकरांना समुद्री प्रवासासाठी आधुनिक व जलद सुविधा मिळणार आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर गेटवे परिसरातील जलवाहतूक क्षेत्र अधिक बळकट होऊन सागरी प्रवासाला चालना मिळेल. तसेच प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा मिळून सागरी पर्यटनात वाढ होईल. शिवाय मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबईकरांना प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.ML/ML/MS