मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटला ; वाहतूक पर्यायी मार्गाने…

रत्नागिरी दि २९:– मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे गॅस टँकर रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघातग्रस्त झाला. गॅस टँकरला झालेल्या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. खबरदारी म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा नजीकची दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस व आपातकालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. स्फोटाचा धोका लक्षात घेता यंत्रणांनी गॅस गळतीवरवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न केले. सध्या या ठिकाणी गॅस गळतीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले असून गॅस ट्रान्सफर चे काम सुरू आहे. दरम्यान येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे. ML/ML/MS