जेएसडब्ल्यू पोर्ट मध्ये वायू गळती, शालेय विद्यार्थी – महिला बाधित…

रत्नागिरी, दि. १३ : जेएसडब्ल्यू पोर्टमध्ये गुरुवारी दुपारी मोठ्या प्रमाणात वायु गळती झाली. देखभालीच्या कामादरम्यान ही वायू गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गळती नंतर ethyl mercaptan हा वायू नजीकच्या परिसरात पसरला. यामुळे जवळील असलेल्या दोन शाळांमधील एकूण 59 विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . सध्या त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील तीन रुग्ण अत्यवस्थ असून इतर जणांची प्रकृती स्थिर आहे. एकूण 60 जण या वायू गळती मुळे बाधित झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ML/ML/SL
13 Dec. 2024