नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती, अनेकजण बेशुद्ध

 नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती, अनेकजण बेशुद्ध

नवी मुंबई, दि. १३ : नवी मुंबईतील आज सकाळी एका कंपनीमध्ये गॅस गळतीची घटना घडली आहे. कार्बन मोनॉक्साईडच्या गळतीमुळे कंपनीतील तब्बल 25 महिला कामगार बेशुद्ध झाल्या असून, एकूण 27 जणांवर या विषारी वायूचा परिणाम झाला आहे. सर्व बाधितांना तात्काळ उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

ही घटना तुर्भे एमआयडीसी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरजवळील डी-326 क्रमांकाच्या औद्योगिक युनिटमध्ये घडली. सकाळच्या सुमारास काम सुरु असतानाच महिला कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तर काहींना डोकेदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणे जाणवू लागली. पाहता पाहता अनेक महिला बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरु करत सर्वांना बाहेर काढले.

कंपनीतील 27 कामगारांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये बहुसंख्य महिला कामगार असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाने सर्व रुग्णांवर आवश्यक ती वैद्यकीय मदत दिली असून, पुढील उपचार सुरु आहेत.

नवी मुंबई महापालिका आणि औद्योगिक सुरक्षा विभागाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत. स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनीही रुग्णालयात जाऊन जखमी मजुरांची भेट घेतली आहे. शिवाय मदतीचे आश्वासन दिले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *