अंत्यसंस्काराला, विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी हे योग्य पर्यायच नाही
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतातील पालापाचोळा आणि विविध पिकांची कापणी झाल्यानंतर शेतात उरलेला पिकांचा भाग यापासून विजय लिमये यांनी मोक्षकाष्ठ अशा नावाने विशेष विटा बनवल्या आहेत. पूर्णपणे जैविक पद्धतीने तयार करण्यात आलेलं मोक्षकाष्ठ लाकडापासून केवळ स्वस्तच नाही, तर पर्यावरण पूरकही आहेत. त्यामुळे मोक्ष काष्ठच्या माध्यमातून केले जाणारे अंत्यसंस्कार पर्यावरणाची हानी करणारे नाहीत. दरम्यान लाकडापासून होणाऱ्या अंत्यसंस्काराला विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी हे योग्य पर्याय नाही. विद्युत दाहिनी मध्ये अखेरीस कोळशापासून तयार होणाऱ्या विजेचा वापर होतो. त्यामुळे पर्यावरणीय हानी होतेच.
लाकडापासून होणारे अंत्यसंस्कार आणि त्याचे पर्यावरणीय समीकरण
एक अंत्यसंस्कारासाठी 320 ते 350 kg लाकूड लागतो.
त्यासाठी पंधरा वर्षे वयाचे दोन झाड तोडावे लागतात.
भारतात दरवर्षी 80 लाख अंत्यसंस्कार लाकडापासून होतात.
त्यामुळे एक कोटी साठ लाख झाडे फक्त अंत्यसंस्कारासाठी तोडावी लागतात.
म्हणजेच अंत्यसंस्काराच्या नावाखाली दरवर्षी 100 वर्ग किलोमीटरचा जंगल आपण नष्ट करतो.
त्या ऐवजी मोक्षकाष्ठ वापरले तर दरवर्षी एक कोटी साठ लाख झाड वाचतील.
शिवाय देशात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर होईल.
मोक्षकाष्ठ तयार करणे ग्रामीण भागातला एक उद्योग होऊ शकेल.
मोक्षकाष्ठ निर्माण करण्याच्या कामात भारतात एक लाख नवे रोजगार निर्माण होऊ शकतात
अंत्यसंस्काराला विद्युत दाहिनी, गॅस दाहिनी योग्य पर्याय नाही
PGB/ML/PGB
29 July 2024