कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक झाले गर्दुल्ल्यांचा अड्डा

 कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक झाले गर्दुल्ल्यांचा अड्डा

मुंबई, दि १४
हार्बर मार्गावरील महत्वाचे स्थानक म्हणून ओळख असणारे कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक हे आता गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा अड्डा म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या दिशेने चढल्यावर आणि एकच्या दिशेने वडाळा येथून चढल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दुल्ले, भिकारी आणि चरसुल्ले थैमान मांडून बसलेले असतात. काही गर्दुल्ले रात्री देखील याच ठिकाणी राहतात आणि सकाळी झोपून उठल्यावर प्रात विधी देखील या ठिकाणी करतात. त्यामुळे या स्थानकावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. हे गर्दुल्ले टोळीने एवढ्या मोठ्या प्रमाणात बसतात की इथून रेल्वे प्रवाशांना ये जा करणे देखील फार त्रासदायक झालेले आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी काळोख असल्याने त्याचा फायदा घेऊन हे गर्दुल्ले प्रवाशांना लुटण्याचे प्रकार देखील वाढले आहे. तरी या गरदूल्यांचा आणि चरसुल्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.
मी रात्रीच्या वेळेस कामावरून येताना हे गर्दुल्ले मोठ्या प्रमाणात एकत्र बसलेले असतात त्यामुळे लोकल ने उतरल्यावर रेल्वे स्थानकावरन एकटीने बाहेर पडणे फार भीतीदायक होते. या गरदुल्यांचे योग्य तो समाचार घ्यावा असे आवाहन सानिका सकपाळ या खाजगी कर्मचारी यांनी दिली.

कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकावर असणाऱ्या गर्दुल्ल्यांबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आम्ही रेल्वे प्रशासनाला आणि रेल्वे पोलीस प्रशासनाला या ठिकाणी कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कळवले असून लवकरच हे रेल्वे स्थानक गर्दुल्ले मुक्त होईल अशी माहीती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्निल नीला यांनी दिली.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *