गणपती स्पेशल 2 मोदी एक्सप्रेसची घोषणा

मुंबई, दि. १3 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील भाविकांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. यावर्षी कोकणवासीयांच्या सेवेसाठी 2 विशेष ट्रेन सोडणार असून सर्व प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवण व पाण्याची व्यवस्था असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
दिनांक 23 व 24 ऑगस्ट 2025 अशा दोन दिवशी सकाळी 11 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून या रेल्वे सुटणार आहेत. याचे तिकीट वाटप सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करायची आहे.
शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 11 वाजता सुटणारी ट्रेन रत्नागिरी आणि कुडाळ ला थांबेल, या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल. तसेच रविवार 24 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी ११ वाजता सुटणारी ट्रेन वैभववाडी व कणकवली येथे थांबेल.
SL/ML/SL