“गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२४” विजेत्यांचा भव्य गौरव सोहळा संपन्न…

मिरा-भाईंदर दि १० :– घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाची सजावट करणाऱ्या भक्तांचे मनोबल वाढवणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे, पाठीवर शाबासकीची थाप देणे तसेच सणासुदीच्या काळात संस्कृतीचे जतन व प्रसार करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या संकल्पनेतून शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मरणार्थ आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२४ आणि शिवसेना मिरा-भाईंदर शहर शाखा आणि प्रताप सरनाईक फाऊन्डेशन आयोजित घरगुती श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२४ मध्ये घेण्यात आली होती.
आज या स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह, महाजन वाडी, मिरा-भाईंदर येथे मंत्री सरनाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून विजेत्यांना गौरविण्यात आले.
मिरा-भाईंदर शहर शिवसेना पक्षाच्या माध्यमांतून घरगुती आणि त्याचसोबत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावट स्पर्धेचे तज्ञ परीक्षकांनी गणपती आरास, सजावट, कलात्मकता, पारंपारिकता, स्वच्छता आणि विषय निवड या निकषांवर गुणांकन केले.
बक्षिसांचे स्वरूप
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मरणार्थ आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव स्पर्धा २०२४ विजयी सार्वजनिक मंडळांपैकी प्रथम पारितोषिक प्रभाग क्रमांक १४ न्यु ग्रीन वुड मंडळ, काशिमीरा रोख रक्कम १ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह , द्वितीय पारितोषिक प्रभाग क्रमांक १० जय भवानी मित्र मंडळ, इंद्रलोक फेज ०२ रोख रक्कम ७५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक प्रभाग क्रमांक २० शांती नगर सेक्टर ०२ रोख रक्कम ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह आणि चौथ पारितोषिक प्रभाग क्रमांक ४ साईनाथ मित्र मंडळ, गोडदेव नाका रोख रक्कम २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच २५ उत्तेजनार्थ मंडळांना प्रत्येकी रोख रक्कम १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
त्याचसोबत मिरा-भाईंदर शहर शिवसेना शाखा आणि प्रताप सरनाईक फाऊन्डेशन आयोजित घरगुती श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२४ विजयी स्पर्धकांना स्पर्धकांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम ५००० रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ३००० रुपये आणि सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख रक्कम २००० रुपये आणि सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ ठरलेल्या विजेत्याला रोख रक्कम १००० रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याबद्दल बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की
“गणेशोत्सव हा केवळ श्रद्धा आणि भक्तीचा सण नाही, तर आपल्या कलात्मक परंपरेचा आणि सामाजिक एकतेचा उत्सव आहे. मिरा-भाईंदर शहरात अनेक वर्षांपासून हि स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून राबवली जात आहे. सजावट स्पर्धांमधून नव्या पिढीला आपली संस्कृती जपण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक सहभागी झालेल्या स्पर्धकांचे योगदान अनमोल आहे आणि त्यांची ही सर्जनशीलता मिरा-भाईंदरच्या सांस्कृतिक ओळखीत नवा रंग भरते.”
ML/ML/SL