गणेश नाईक यांचा जनता दरबार.

ठाणे, दि २२
जनता दरबारबद्दल
आज लोक आपली समस्या घेऊन येत आहेत, बऱ्याचशा समस्या या मानवनिर्मित आहेत, नैसर्गिक समस्या कमी आहेत, प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे, निश्चितपणे मागच्या जनता दरबारचा निपटारा समस्यांचा बरापैकी सोडवलेला आहे
मला विश्वास आहे की प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी जनसामान्याच्या समस्या योग्य मार्गाने सोडवतील
बिल्डर लोकांनी जुन्या लोकांना बिल्डिंग मधील जागा खाली करायला लावल्या आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यावर त्यांना तिथे जागाच दिली नाही अशा प्रकारच्या समस्या जास्त आहेत
ठाणे परिवहन सेवेमधल्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे दोन दोन वर्ष होऊनही त्यांना मोबाईलला दिला गेलेला नाही अशा तक्रारी आल्या आहेत
आनंद परांजपे गडकरी नाट्यगृह कोनशीला तक्रार*
जे झाले ते चुकीच आहे, आनंद परांजपे यांनी जे सांगितलं आहे ते रास्त आहे, गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव मैदान सतीश प्रधान नगराध्यक्ष असताना या दोन्ही वास्तू निर्माण झाल्या आहेत आणि ठाण्याचं हे भूषण आहे
याचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं, बाळासाहेबांनी या वास्तूंचं उद्घाटन केल्याने त्यांच्या नावाच्या पाट्या दर्शनी भागात लावायला हव्या होत्या, आनंद परांजपे यांची जी काही भूमिका आहे याबाबत ठाणे पालिका आयुक्तांना नक्कीच सांगू
बीवलकर कुटुंबाबद्दल
बीवलकर कुटुंबाची तक्रार आमचे एसीएस अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे दिलेली आहे, याबाबतीत खरं खोटं काय हे तपासण्यास सांगितले आहे
वन खात्याचा त्याच्यात दोष काय, वन खात्याने कोणाला जमिनी दिलेल्या नाहीत, वन खाता सतर्क आहे, वन खात्याचे सर्व अधिकारी अतिशय सतर्क आहेत, कुठल्याही परिस्थितीत वनखात्याची जमीन कोणाच्याही घशात घातली जाणार नाही याची दक्षता वन खात घेत आहे
येऊर अनधिकृत बांधकाम
येऊरचा परिसर हा गाव आहे, तो महानगरपालिकेचा भाग आहे, त्या ठिकाणी वनखात्याचा काही अधिकार नाही, तिथे अनधिकृत बांधकामे झाले असतील तर आम्हाला सांगा जर वनविभागाचा भाग असेल तर आम्ही त्वरित कारवाई करू
ऑन महापालिका निवडणुका निर्णय
नवी मुंबईमध्ये भाजप नंबर एक आहे, भाईंदर, उल्हासनगरमध्ये नंबर एक आहे
पालघर मध्ये जिल्हा परिषद भाजपचीच, तिथे सगळे आमदार मित्र पक्षाचेच आहेत, तिथला खासदार देखील भाजपचा असल्याने तिथे प्राबल्य भाजपचच आहे
तिथे आनंद परांजपे किंवा अजितदादांनी नक्कीच प्रयत्न केले पाहिजे त्यांना यश मिळवण्यासाठी त्यांना कोणी रोखण्याची गरज नाही
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील प्रयत्न केले पाहिजेत, शक्य झाले तर महायुतीचीच निवडणूक व्हावी अशी अपेक्षा आहे
एरवी जर आनंद परांजपे यांनी सांगितल्यावर की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे तर त्यांना कोणी विरोध नाही करणार, तेव्हा मी सांगेल की आनंद परांजपे यांची इच्छा आहे त्यांना लढू द्या
ठाण्यातले भाजपचे पदाधिकारी,आमदार यांची इच्छा काय आहे ती योग्य वेळी तपासली जाईल
आता बोलणं उचित होणार नाही, शक्यतो महायुती म्हणून लढावं असं सगळ्यांचं ओग आहे पण उद्याला जर एखाद्या ठिकाणी खरोखर समोरच्या पक्षावर अन्याय होणार असेल तर तर त्यांना मुभा दिली पाहिजे
आधी निवडणुका लागू द्या मग याविषयी आपण जास्त बोलू
मी असं म्हणणार नाही की महायुतीची लोक आपण एकाच बाजूने लढू, काही ठिकाणी बंडखोरी होणारच आहे, आजवरचा तो शिरस्ता आहे, ज्याला नाही तिकीट मिळाली, ज्याचं प्राबल्य जास्त आहे तर तो स्वतंत्र लढणारच त्याला कोण रोखू शकत.AG/ML/MS