माघी गणेशोत्सवापासून रखडलेल्या गणेशमूर्तींचे आज विसर्जन

मुंबई, दि. २ : पीओपी गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आज माघी गणेशोत्सवात विराजमान झालेल्या डहाणूकरवाडीतील श्री आणि चारकोपचा राजाचे तब्बल ६ महिन्यांनंतर गणेशभक्तांनी विसर्जन केले. या विसर्जन मिरवणुकीत गोविंदा पथकांनी थर रचून मानवंदना दिली. त्यात साईलीला दहिकाला पथक(गोराई उत्कर्ष दहिकाला पथक, स्वस्तिक महिला गोविंदा पथक, ओम साई माऊली क्रीडा मंडळांचा समावेश होता.
पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलाशयात विसर्जन करण्यात येऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB),राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने (BMC)पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले होते. मात्र कांदिवलीचा श्री आणि चारकोपचा राजा कृत्रिम तलावात आपल्या मूर्तींचे विसर्जन करण्यास नकार दिला होता. कांदिवलीच्या श्री मंडळाने आपली मूर्ती मंडपालगतच्या मैदानात झाकून ठेवली होती. तर चारकोपचा राजा या मंडळाने मूर्ती अज्ञातस्थळी झाकून ठेवली होती. उच्च न्यायालयाने सहा फुटांवरील मूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्याची परवानगी दिल्यानंतर या दोन्ही मंडळांनी मूर्तींचे समुद्रात विसर्जन केले.
SL/ML/SL