साताऱ्यातील महिला गणेशमूर्तीकाराला दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रण

सातारा, दि. ५ : सातारा जिल्ह्यातील परळी गावच्या महिला गणेश मूर्तिकार उद्योजिका अंजना शंकर कुंभार यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात व लाल किल्ल्यावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांनीच निमंत्रित केले आहे. टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन ही निमंत्रण पत्रिका नुकतीच त्यांना सुपूर्द केली.
अंजना कुंभार यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. गावापासून सुरू झालेला हा प्रवास राज्यभर पोहोचला आणि त्यांच्या या कार्याची दखल थेट दिल्लीतील सर्वोच्च कार्यालयांनी घेतली. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अंजना कुंभार यांची ही प्रेरणादायी कहाणी पोहोचली.
याच उत्तुंग कामगिरीमुळे त्यांना येत्या १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आणि राष्ट्रपती भवनातील स्वागत समारंभासाठी ‘विशेष निमंत्रित’ म्हणून बोलावण्यात आले आहे. जिल्ह्यातून हा मान मिळवणाऱ्या त्या एकमेव नवउद्योजिका आहेत.
SL/ML/SL