गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वांत मोठ्या प्रकाशकांपैकी एक अशी ख्याती असलेल्या उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील गीता प्रेसला केंद्र शासनाने २०२१ चा गांधी शांतता पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. या पुरस्काराची रक्कम १ कोटी रुपये एवढी आहे. मात्र गीता प्रेसच्या संचालकांनी आपण फक्त पुरस्कार स्वीकारू, मानधनाची रक्कम स्वीकारणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.
गीता प्रेसचे व्यवस्थापक लालमणी तिवारी म्हणाले की, ‘गीता प्रेसने 100 वर्षांत कधीही आर्थिक मदत किंवा देणगी घेतली नाही. याशिवाय पुरस्काराबरोबर मिळालेली कोणतीही रक्कम स्वीकारली नाही.’हा सन्मान आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. परंतु, पुरस्काराबरोबर मिळालेली रक्कम स्वीकारली जाणार नाही, असा निर्णय बोर्डाने घेतला आहे.” या सन्मानाबद्दल त्यांनी पीएम मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे आभार मानले.
पंतप्रधान मोदी यांनी गीता प्रेसचे अभिनंदन केले होते. गीता प्रेसच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करणे हे समाजसेवेतील कार्याचे कौतुक आहे. गांधी शांतता पुरस्कार 2021 द्वारे मानवतेच्या सामूहिक विकासासाठी गीता प्रेसनं दिलेल्या महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय योगदानाला पावती आहे. तसेच खर्या अर्थाने ते गांधीवादी जीवनपद्धतीचे प्रतीक आहे असे पंतप्रधान म्हणाले.
गीता प्रेस बाबत
या प्रेसची स्थापना 1923 मध्ये झाली. ते जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. त्यांनी 14 भाषांमध्ये 417 दशलक्ष पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यापैकी 16.21 कोटी श्रीमद भगवद्गीता आहेत. गीता प्रेसने आतापर्यंत सनातन धर्माची ९२ कोटी पुस्तके छापली आहेत, हा एक विक्रम आहे. याच वर्षी तब्बल 2 कोटी 42 लाख पुस्तके प्रकाशित केली आहेत. रामचरितमानस बाबतच्या राजकीय वादानंतर 50 हजार अधिक पुस्तकांची विक्री झाली आहे. तसेच प्रेसचे उत्पन्नही वाढले आहे.गीता प्रेस कार्यालय मंदिरासारखे आहे. इथे नियमित काम पूजेपेक्षा कमी नाही. इथे भिंतींवर श्लोकांबरोबरच गुटखा, पान-मसाला, धुम्रपान न करण्याच्या कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
काम करणारे कर्मचारी पुस्तकाच्या फायनल बाइंडिंगवेळी बूट आणि चप्पल काढून छपाईचे काम करतात. वाचकांच्या विश्वास आणि श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून ते तसे करतात. कॅम्पसमध्च्याये प्रेस मशीनसह एक भव्य आर्ट गॅलरीदेखील आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले होते.
गीता प्रेसमध्ये सध्या 15 भाषांमध्ये 1848 प्रकारची पुस्तके प्रकाशित होत आहेत. प्रेसच्या देशभरात 20 शाखा आहेत. गीता प्रेसमध्ये दररोज 70 हजार पुस्तके प्रकाशित होत आहेत, तर सुमारे 1 लाख पुस्तकांना मागणी आहे.
SL/KA/SL
19 June 2023