विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गिरीश गांधी विजयी

 विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गिरीश गांधी विजयी

नागपूर दि १५ : विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत गिरीश गांधी विजयी झालेले आहेत. गिरीश गांधी यांना 2661 मते मिळाली तर प्रदीप दाते यांना 1187, तर डॉ. श्रीपाद जोशी यांना 701 मते मिळाली. डॉ. रविंद्र शोभणे यांना 205 मते मिळाली तर रंजन दारव्हेकर यांना 114 मते मिळाली.

अध्यक्ष पदी निवडून आल्यानंतर गिरीश गांधी यांचे कार्यकर्त्यांनी पेढे चारून अभिनंदन केले. आज सकाळी नागपुरातील सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात मतमोजणीला सुरुवात झालेली होती. 22 सभासदांसाठी मतमोजणी सुरू आहे. 22 सभासदांसाठी 83 उमेदवार रिंगणात आहेत तर अध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार रिंगणात होते. साहित्य संघाच्या निवडणुकीत राजकीय उमेदवारांनी उडी घेतल्यामुळे या निवडणुकीला राजकीय रंग प्राप्त झालेला होता. रात्री उशिरा पर्यंत उर्वरित सदस्य निवडीचे निकाल कळतील.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *