मराठवाड्यात गणरायाचे आगमन उत्साहात

छ. संभाजीनगर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरात सर्वत्र गणेशमूर्ती स्थापनेची तयारी जोरात सुरू आहे. गणेश मंडळे, घरगुती गणपतीच्या मूर्ती नेण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी जमली असुन गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य घेण्यासाठी भक्तांचा आणि बाळगोपाळांचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, जनतेमध्ये पर्यावरणाची जागृती झाल्याने शाडू मातीच्या गणपतींना लोक प्राधान्य देत आहेत.
शहरातील मानाचा संस्थान गणपती याची स्थापना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट या नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात सकाळी ११ वाजता झाली.
सकल महाराष्ट्राचे आद्यदैवत,१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाचे आज मंगळवारी जालन्यात घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले आहे. शहरातील बाजारपेठ गत तीन दिवसांपासूनच गर्दीने फुलली असून काल सोमवारी तर गणरायाच्या आगमनाप्रित्यर्थ शहरात उत्साहाचे वातावरण होते.
घरोघरी गणपती गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे.
शहराच्या विविध भागांत मूर्तीची विक्री करणारे अनेक स्टॉल लागले आहेत तर बहुतांश सार्वजनिक मंडळात मंडप आणि सजावटीच्या कामाला वेग देऊन अंतिम हात फिरविला जात आहे. शहरातील विविध भागांत गणपतीच्या मूर्तीची विक्रीचा वेग वाढलेला असून सजावट साहित्य खरेदीसाठीचा अमाप उत्साह दिसून येत होता. मुख्य बाजारपेठ आणि स्टॉल्सना जणू जत्रेचे स्वरूप आले होते.यामुळे बाजार पेठेत वर्दळ वाढली होती.
आज मंगळवारी सकाळीच प्राणप्रतिष्ठा करायची असल्याने काहींनी सोमवारीच मूर्ती घरी नेऊन झाकून ठेवल्या तर काहींनी विक्रेत्यांकडे नोंदणी करून आज सकाळीच लवकर जाऊन मूर्ती घेऊन आले असून यावेळी बाळ गोपाळा सह अबाल वृद्धांचा आनंद शिगेला पोहचलेला दिसून आला. सकाळ पासूनच गणरायाचा आगमनाची सुरुवात झाली असून त्यानंतर पूजाविधी करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून नंतर आरती करून प्रसादाचे वाटप करून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष भक्तगण करीत आहेत.
लातुरात लाल मातीचे गणपती
लातुरात यंदा इको फ्रेंडली गणेश मूर्ती घेण्यासाठी भक्तांनी पसंती दिली आहे. लातूरच्या शिल्पकारांनी कर्नाटक राज्यातून लाल मातीचे कच्य्या मूर्ती आणून लातूरात त्याच्यावर कलाकुसर, आकर्षक रंग संगती करुन त्याच्यात सजीवता आणली आहे.
ML/KA/SL
19 Sept. 2023