आठ वर्षात २२६ गडकिल्ले सर करणारा अवलिया

अलिबाग दि ३– रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल शहर येथील सीकेटी विद्यालय येथे मुख्याध्यापक असलेले सुभाष मानकर यांनी गेल्या आठ वर्षात २२६ गडकिल्ले सर केले आहेत. सन २००१ ते २०१५ या कालावधीत प्राथमिक शिक्षक म्हणून काम केल्यानंतर आज ते पनवेल येथील सीकेटी विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत.
मुळात मुळशी तालुक्यातील कोरी गडाच्या पायथ्याशी छंद म्हणून शनिवार – रविवार त्या किल्ल्यावर जाणे येणे असल्याने किल्ल्यांची आवड निर्माण झाली. छत्रपती शिवरायांबद्दल मनात प्रचंड आदर असल्यामुळे शिवरायांनी स्थापन केलेले गड किल्ले बघणे व त्यांचा अभ्यास करणे अशी इच्छा मनात आपोआप निर्माण झाली व त्यातूनच अनेक प्रकाराने किल्ले बघण्यास सुरुवात झाली.
महाराष्ट्रातील असलेल्या दुर्गम डोंगर भागातील २७ किल्ल्यांना भेटी देत २०० किल्ल्यांचा ट्रेक पूर्ण केले आहेत. वेगवेगळ्या गावातील गड किल्ल्यांचा शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठान चे ट्रेकर सुभाष मानकर यांनी गड किल्ल्याचा प्रचार व प्रसार सुरू केला आहे. २०१७ पासून आजपर्यंत २२६ गड किल्ल्यांचा ट्रेक पूर्ण केले असल्याने सुभाष मानकर यांच्या साहसी वृत्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक गड किल्ले जवळजवळ पूर्ण केलेले असून प्रत्येक महिन्याला एक ट्रेकचे नियोजन केले जात असून त्यांनी आतापर्यंत पुणे, रायगड, ठाणे, सातारा, नाशिक, पालघर, कोल्हापूर, धुळे, जळगाव, गोवा, कर्नाटक, गुजरातच्या किल्ल्यांचे भ्रमण केले आहे.
किल्ल्यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीला प्रेरणादायी ठरावा त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे याकरिता गड किल्ल्यांवर जाऊन त्यांनी वाढलेले गवत, प्लास्टिक जमा करणे, गड किल्ल्यांची सफाई साफसफाई व परिसर स्वच्छता अशा मोहिमांमध्ये सहभाग घेतात.
प्रत्येक गडकोट किल्ल्यांचे फोटो व त्याची माहिती घेत गडकोट किल्ल्याचा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आतापर्यंत २२६ किल्ल्यांचा ट्रेक पूर्ण केला आहे. रविवार आणि जोडून सुट्टी आली की महिन्यातून एक दोन किल्ले तरी बघितले जातात किंवा ज्या वेळेस मे महिना आणि इतर वेळेस सुट्टी असते त्या सुट्ट्यांचा वेळेत किल्ले बघणे हा छंद जोपासला जातो.
गड किल्ल्यांचे नियोजन करताना सांगितले की “आम्ही एका दिवसामध्ये अवघड किल्ला असेल तर एकच करतो. मध्यम श्रेणीचा किल्ला असेल तर एका दिवसात दोन किंवा तीन किल्ले करतो आणि भुईकोट किल्ला असेल तर एका दिवसात पाच ते सहा किल्ले होतात अशा प्रकारे नियोजन करून त्याची अंमलबजावणी केली जाते.”
शेवटी एकच निश्चय करून सांगतो की शेवटच्या क्षणापर्यंत मी ५०० किल्ले सर करणार असा मानस सुभाष मानकर यांनी व्यक्त केला .