गडचिरोलीत पावसाचा कहर, पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी….

गडचिरोली दि १९:– गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरला असून पावसाने परत जोरदार हजेरी लावली आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून भामरागड तालुक्यात तिन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटलेला आहे.
पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, खंडी नाल्यात काल एका युवकाचा या पुरात वाहून १९ वर्षीय तरुण वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. १८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्गावरील (NH-130 D) वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे तालुक्याचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, याच दिवशी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कोडपे गावातील १९ वर्षीय लालचंद कपिलसाय लकडा हा खंडी नाल्यातून जात असताना प्रचंड पुराच्या पाण्यात वाहून गेला. घटनेनंतर प्रशासन आणि स्थानिकांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.ML/ML/MS