G-20 शिखर परिषदे अंतर्गत राज्यात बीचला स्वच्छता मोहीम

 G-20 शिखर परिषदे अंतर्गत राज्यात बीचला स्वच्छता मोहीम

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज देशभरात स्वच्छता मोहिमेसाठी देशातील ३७ समुद्र किनारे तसेच जगभरातील इतर देशांमधील १९ समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली होती G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर देशभरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचेआयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील प्रगतीवर विशेष भर दिला जात आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून समुद्र किनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याच्या उद्देशाने जगभरातील काही निवडक समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. G-20 शिखर परिषदे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत भारतातील एकूण ३७ किनाऱ्यांसह जगभरातील इतर १९ समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील एकूण चार समुद्र किनाऱ्यांची निवड झालेली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील चिवला, रत्नागिरी , मुंबईतील जुहू आणि ठाणे जिल्ह्यातील उत्तन समुद्र किनाऱ्याला पसंती देण्यात आलेली होती. कच-याचा विशेषतः प्लास्टिक कचऱ्याचा समुद्र आणि महासागरावर व येथील जैवविविधतेवर होणान्या परिणामांकडे जागतिक पातळीवर लक्ष वेधणे तसेच यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांच्या सहभागाने समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी व येथील परीसंस्थेचे जतन करण्यासाठी G-20 देशांमध्ये सामुहिक कृती करणे हे या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे. गतवर्षी २०२२ साली झालेल्या इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे व सहकार्यामुळे मालवण शहराला देशपातळीवर केंद्रशासनाकडून गौरविण्यात आलेले होते.

ML/KA/PGB 21 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *