मलंगगडावर अडकली नव्याने सुरू केलेली फ्युनिकुलर ट्रॉली

 मलंगगडावर अडकली नव्याने सुरू केलेली फ्युनिकुलर ट्रॉली

कल्याण, दि. ३ : कल्याणनजिकच्या मलंगगडावर जाण्यासाठी काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेली फ्युनिकुलर ट्रॉली मलंगगडावर भाविकांना घेऊन जाताना मध्येच अडकली आहे. भाविक मध्येच अडकल्यामुळे खळबळ उडाली आहे. यात्रेच्या निमित्ताने आज गडावर मोठी गर्दी आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त भाविक घेऊन गेल्यामुळे फ्युनिकुलर वाटेतच अडकली असल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी भाविकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

देशातील सर्वात मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या फ्युनिक्युलर ट्रॉलीचं लोकार्पण गेल्या महिन्यात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झालं होतं. आज मोठ्या संख्येनं यात्रेसाठी भाविक जमा झाले आहे. पण, अचानक दुपारच्या सुमारास फ्युनिक्युलर ट्रॉलीही वाटेतच बंद पडली.

ठाणे जिल्ह्यातील मलंगगड हे हिंदू आणि मुस्लिम भाविकांचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गडावर जाण्यासाठी आतापर्यंत भाविकांना कठीण अशी दोन तासांची चढण चढावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अतिशय त्रासदायक ठरत होता. ही अडचण लक्षात घेऊन अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्वित्झर्लंडच्या धर्तीवर मलंगगडावर फ्युनिक्युलर रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

मलंगगडावर जाण्यासाठी फ्युनिक्युलर ट्रॉलीसाठी दोन ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. या फ्युनिक्युलर ट्रॉलीमध्ये दोन प्रशस्त डब्बे आहेत. या सेवेच्या माध्यमातून दर तासाला सुमारे 1200 प्रवासी प्रवास करू शकतात. सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज कंपनीकडे फ्युनिक्युलर ट्रॉलीचं व्यवस्थापन आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी सुमारे 70 कर्मचारी तैनात आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *