बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

 बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

नवी मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर आज नेरुळमधील सारसोळे गावातील शांतीधाम वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी शासकीय इतमामात हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आले. यावेळी बाबा महाराज यांचे नातू हभप चिन्मय महाराज सातारकर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.

बाबा महाराज यांची मोठी बहीण माई महाराज, मुलगी हभप भगवती ताई महाराज सातारकर, रासेश्वरी सोनकर हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवी मुंबई पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

सायंकाळी शांतीधाम स्मशानभूमीत पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून तर पोलीस बँड पथकाने धून वाजवून मानवंदना दिली. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी यावेळी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. Funeral of Baba Maharaj Satarkar

ML/KA/PGB
27 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *