अजित वर्टी यांच्यावर अंत्यसंस्कार

 अजित वर्टी यांच्यावर अंत्यसंस्कार

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव,एमएमआरडीएचे माजी आयुक्त ,मुंबई महानगर पालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त व राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष अजित वर्टी ( ८०) यांचे काल परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.Funeral for Ajit Varti

त्यांचे पार्थिव आज दुपारी अंत्यदर्शनासाठी त्यांच्या वरळी येथील डॉ. जयवंत पालकर मार्ग येथील प्रणित इमारतीत ठेवण्यात आले होते.त्यानंतर आज दुपारी शिवाजी पार्क येथील विद्युत दहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अनेक आजी व माजी प्रशासकीय अधिकारी तसेच अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

दिवंगत अजित वर्टी यांनी माजी महसूल सचिव,माजी माहिती महासंचालक तसेच माजी मुख्यमंत्री डॉ.मनोहर जोशी यांचे सचिव आदी विविध पदे त्यांनी भूषवली होती. तसेच रिलायन्स समूहात वरिष्ठ पदावर विविध पदे भूषवतांना रिलायन्सच्या नवी मुंबई एसईझेडच्या निर्मितीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

ML/KA/PGB
5 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *