फरार ललित मोदीने घेतले या देशाचे नागरिकत्त्व
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल १२ वर्षांपासून भारतातून फरार असलेला IPL चा माजी अध्यक्ष आणि घोटाळेबाज ललित मोदी याने प्रशांत महासागरातील छोट्याशा बेटावर वसलेल्या वनुआतु या देशाचे नागरिकत्व मिळवले आहे. भारताच्या कायद्यापासून स्वतःला वाचण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली आहे. त्यामुळे त्याचे भारतात प्रत्यार्पण करणे अवघड होणार आहे.
ललित मोदीच्या नव्या पासपोर्टचा फोटो व्हायरल झाला आहे. ललित मोदीने वनुआतु या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे वृत्त आहे.२०१० मध्ये ललित मोदीने भारतातून लंडनला पलायन केले होते. त्याच्यावर आर्थिक अनियमितता,मनी लॉण्डरिंग आणि भ्रष्टाचार यांसारखे गंभीर आरोप आहेत. ईडीने त्याच्या विरोधात कारवाई सुरू केली होती. न्यायालयानेही त्याला हजर करण्याचे निर्देश दिले होते, परंतु त्याने देशाबाहेर पलायन केले.ललित मोदीवर आयपीएल मीडिया राइट्स आणि फ्रँचायजी कराराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
IPL ची संकल्पना ही ललित मोदीची होती. ही BCCI साठी ही संकल्पना सोन्याची खाण ठरली. त्यानंतर ललित मोदीवर गंभीर आरोप करण्यात आले आणि त्याने भारतामधून पलायन केले.
SL/ML/SL
26 Feb. 2025