FASSAI ने बदलले ORS लेबलिंगचे नियम

नवी दिल्ली, दि. 16 : फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने ORS लेबलींग बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जर एखाद्या अन्न किंवा पेय उत्पादनाच्या फॉर्म्युलाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिली नसेल, तर कंपनी त्यावर ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स (ORS) असल्याचे लेबल लावू शकत नाही, हे स्पष्ट करत FASSAI ने सर्व कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांमधून ORS लेबल काढून टाकण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या २०२२ आणि २०२४ च्या आदेशांमुळे कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांमध्ये ORS हा शब्द उपसर्ग (सुरुवातीला) किंवा प्रत्यय (शेवटी) म्हणून जोडण्याची परवानगी मिळाली. यानंतर, काही फळ पेये, नॉन-कार्बोनेटेड किंवा रेडी-टू-ड्रिंक पेये यांना ORS असे लेबल लावले जाऊ लागले. मात्र, त्यानंतर अशी अट घालण्यात आली की उत्पादनात स्पष्टपणे नमूद केले पाहिजे की ते WHO-शिफारस केलेल्या ORS सूत्राची पूर्तता करत नाही. आता, FSSAI ने हे मागील आदेश पूर्णपणे रद्द केले आहेत.
सरकारने म्हटले आहे की यामुळे बनावट ओआरएस उत्पादनांना आळा बसेल आणि ग्राहकांना खरे, सुरक्षित आणि डब्ल्यूएचओ-मानक ओआरएस उत्पादने मिळतील याची खात्री होईल. यामुळे आरोग्य सुरक्षा मजबूत होण्यास मदत होईल.
बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवरंजनी संतोष यांनी सोशल मीडियावर सरकारच्या या पावलाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “आता कोणतीही कंपनी WHO ने शिफारस केलेल्या सूत्राशिवाय ORS हे नाव वापरू शकणार नाही. हा आदेश तात्काळ लागू होईल.” डॉ. संतोष गेल्या काही काळापासून चुकीच्या लेबल असलेल्या ओआरएस ब्रँड्सविरुद्ध मोहीम राबवत आहेत. या निर्णयात त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व पालक, डॉक्टर, पत्रकार आणि शिक्षकांचे त्यांनी आभार मानले.
SL/ML/SL 16 Oct. 2025