ऊसाच्या एफ आर पी मध्ये केंद्राने दिली २२५ रुपयांची वाढ….
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारनं ऊसाच्या
एफआरपीत प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय काल (बुधवारी) रात्री घेतला. हा निर्णय २०२४-२५ या साखर हंगामासाठी लागू असणार आहे.
उसतून निघणाऱ्या १०.२५ टक्के उताऱ्याला प्रतिटन
३४०० रुपये दर यामुळे आता मिळणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर ऊस उत्पादक यामुळे
शेतकरी खुश झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत
एफआरपी वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी काल देण्यात आली. उसाच्या १०.२५ टक्के
उताऱ्याला प्रतिटन ३४०० रुपये दर आणि त्यापुढील प्रत्येक टक्क्याला ३३२ रुपये वाढीव दर देण्यात येईल.
तसंच नऊ पूर्णांक 30 टक्के उतारा असलेल्या ऊसाला तीन हजार 151 रुपये निश्चित दर देण्याला मंजुरी देण्यात आली आहे.
उसाच्या A2-एफ एल या सूत्रानुसार येणाऱ्या खर्चापेक्षा 107% हा दर जादा आहे.
त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अंगणात समृद्धी येईल असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.
हा दर जगात सर्वाधिक आहे.
याचवेळी केंद्र सरकार देशातील ग्राहकांना जगात सर्वात स्वस्त साखर उपलब्ध करून देत आहे असेही केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात येते आहे .
ऊसाच्या एफ आर पी मध्ये केंद्राने दिली २२५ रुपयांची वाढ….नवी दिल्ली दि २२– केंद्र सरकारनं ऊसाच्याएफआरपीत प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय काल (बुधवारी) रात्री घेतला. हा निर्णय २०२४-२५ या साखर हंगामासाठी लागू असणार आहे.उसतून निघणाऱ्या १०.२५ टक्के उताऱ्याला प्रतिटन३४०० रुपये दर यामुळे आता मिळणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर ऊस उत्पादक यामुळेशेतकरी खुश झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याअध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीतएफआरपी वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी काल देण्यात आली. उसाच्या १०.२५ टक्केउताऱ्याला प्रतिटन ३४०० रुपये दर आणि त्यापुढील प्रत्येक टक्क्याला ३३२ रुपये वाढीव दर देण्यात येईल.तसंच नऊ पूर्णांक 30 टक्के उतारा असलेल्या ऊसाला तीन हजार 151 रुपये निश्चित दर देण्याला मंजुरी देण्यात आली आहे.उसाच्या A2-एफ एल या सूत्रानुसार येणाऱ्या खर्चापेक्षा 107% हा दर जादा आहे.त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अंगणात समृद्धी येईल असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.हा दर जगात सर्वाधिक आहे.याचवेळी केंद्र सरकार देशातील ग्राहकांना जगात सर्वात स्वस्त साखर उपलब्ध करून देत आहे असेही केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात येते आहे .
ML/KA/PGB 22 Feb 2024