शिवजयंतीपासून दांडपट्ट्याला मिळणार राज्यशस्त्राचा मान

 शिवजयंतीपासून दांडपट्ट्याला मिळणार राज्यशस्त्राचा मान

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दरवर्षी प्रमाणेच उद्या १९ फेब्रुवारी ला राज्यभर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकाचं यंदाचं ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने शिवजयंतीच्याच दिवशी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे यावर्षी आग्र्यातील ऐतिहासिक किल्ल्यात देखील शिवजयंती साजरी केली जाणार आहे. आग्र्यात शिवजयंती साजरी करून त्याच दिवशी दांडपट्टा हे राज्यशस्त्र म्हणून घोषित केले जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आग्रा दौऱ्यावर आहेत. आता दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून नवी ओळख निर्माण होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आग्र्यात रात्री ८ वाजता लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.

आग्र्यात पार पडणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवर उपस्थित राहणार आहेत.औरंगजेबाने आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भरदरबारात अपमान केला होता. आग्र्यात त्याच दरबारात आता येत्या सोमवारी ‘जय शिवाजी-जय भवानी’ या घोषणांचा जयघोषहोईल. त्यानंतर शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

SL/KA/SL

18 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *