मिडल ईस्ट संकट व ‘Friday the 13th’ ने बाजाराला धक्का; कच्च्या तेलाच्या आणि सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ

जितेश सावंत
Markets Rattled by Middle East Crisis and ‘Friday the 13th’; Crude Oil and Gold Prices Surge. इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. यासोबतच अमेरिका-चीन व्यापार वाटाघाटींवरील अनिश्चिततेमुळे १३ जून रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार निर्देशांक सुमारे १ टक्क्यांनी घसरले.
The geopolitical tensions between Israel and Iran led to a sharp rise in crude oil prices, causing the Indian stock market to fall nearly 1% in the week ending June 13.
मिडल ईस्टमधील नव्याने उफाळून आलेल्या भू-राजकीय संकटामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले.
तथापि, मागील ७५ महिन्यांतील नीचांकी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित महागाई दर आणि देशात मान्सूनची समाधानकारक प्रगती यामुळे भारतीय बाजाराला काहीसा दिलासा मिळाला.
Fear spread among investors due to the Middle East crisis, but low inflation and a good monsoon provided some relief to the markets. अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केली.शुक्रवारी एमसीएक्सवरील सोन्याच्या वायदे कराराने पहिल्यांदाच ₹१,००,००० ची पातळी ओलांडली. Investors shifted to safe-haven assets, pushing gold futures above ₹1,00,000 for the first time.
पुढील आठवड्यातील बाजाराची दिशा :
गुंतवणूकदारांनी ‘या’ 4 प्रमुख बाबींवर ठेवावी नजर
१. कच्च्या तेलाच्या किंमती
इस्रायल-इराणमधील थेट हल्ल्यांच्या वाढत्या सत्रामुळे कच्च्या तेलाच्या दरात तीव्र वाढ झाली. इराणने हैफासह (जे इस्रायलच्या सर्वात मोठ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ आहे)इस्रायलमधील शहरांवर २०० हून अधिक क्षेपणास्त्रं डागल्याने तणाव वाढला असून, तेलपुरवठ्यावर संभाव्य धोका निर्माण झाला आहे. (भारत जास्तीत जास्त तेल आयात करणारा देश असल्याने ही किंमतवाढ महागाईचा धोका वाढवते)
२. फेडरल रिझर्व्हची व्याजदर बैठक
अनेक अहवालांनुसार वॉल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे की अमेरिकन फेडरल रिझर्व्ह चालू व्याजदर श्रेणी (४.२५%-४.५०%) कायम ठेवेल. मात्र, तेलाच्या दरातील वाढ आणि वाढती महागाई दर कपातीच्या शक्यता कमी करत आहे.
3. FII-DII ची भूमिका
परदेशी संस्था गुंतवणूकदारांनी (FII) सलग चौथ्या आठवड्यात विक्रीचा कल कायम ठेवत भारतीय शेअर बाजारातून ₹1,246.51 कोटींची शेअर विक्री केली. जागतिक भू-राजकीय तणाव, महागाईची भीती आणि फेडच्या व्याजदर धोरणामुळे एफआयआयने सावध भूमिका घेतली आहे तथापि, देशांतर्गत संस्था गुंतवणूकदारांनी (DII) सलग आठव्या आठवड्यात खरेदी सुरू ठेवली त्यांच्या मजबूत मजबूत खरेदीने बाजारात संतुलन राखले गेले आहे.
४. रुपयाची चाल
भारतीय रुपया सलग तिसऱ्या आठवड्यात घसरणीच्या मार्गावर राहिला. १३ जून रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत ४६ पैशांनी घसरून ₹८६.०९ वर बंद झाला, जो ६ जूनच्या ₹८५.६३ च्या बंद भावापेक्षा कमी आहे.जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे रुपयावर दबाव निर्माण झाला आहे..
Four key factors will influence the market next week:
- Crude Oil Prices: Rising due to Israel-Iran conflict, increasing inflation concerns in India.
- Federal Reserve Meeting: Interest rates likely to remain unchanged, but inflation limits chances of a rate cut.
- FII-DII Activity: Foreign investors continue selling, while domestic investors keep buying.
- Rupee Movement: The rupee depreciated further to ₹86.09 against the dollar.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 24718
KeySupportLevels: 24690,24630,24544,24522,24481,24461,24419,24400,24367and24261Breaking these could lead the Nifty to further lower levels.
ResistanceLevels:,
24730,24750,24837,24872,24895,24901,24923,24983,25003,5079,25128,25170, and 25223. These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant
ML/MS