राज्यातील या मनपाकडून नागरिकांना मोफत WiFi
मुंबई, दि. ५ : मीरा-भाईंदर शहर लवकरच महाराष्ट्रातील पहिले ‘फ्री वायफाय’ देणारे (Free WiFi) शहर ठरणार आहे. मीरा-भाईंदर शहर डिजिटल करण्याच्या दिशेने महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत ही घोषणा केली.
मीरा-भाईंदरमधील नागरिकांना ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची मोफत उपलब्धता देणारे हे वायफाय तंत्रज्ञान ‘प्रगतीची नवी लाट’ घेऊन येईल असं ही ते म्हणाले. या संदर्भात, महाराष्ट्र सरकार आणि स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला आहे. महाराष्ट्र हे स्टारलिंकसोबत भागीदारी करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. या करारामुळे राज्यातील दुर्गम भागांत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहोचणार आहे.
SL/ML/SL