शाडूच्या मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांना पालिकेतर्फे नि:शुल्क माती आणि जागा
मुंबई दि.7( एम एमसी न्यूज नेटवर्क) : निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, हा उद्देश ठेऊन यावर्षी घरगुती स्तरावरील श्रीगणेश मूर्ती या 4 फुट उंचीपर्यंतच्याच असणे व त्या केवळ शाडू माती किंवा अन्य पर्यावरण पूरक साहित्य पासून तयार करणे बंधनकारक असणे;या सारखे महत्वाचे निर्णय पालिकेने घेतले आहेत .
शाडू मातीच्या तसेच पर्यावरणपूरक साहित्यांपासून गणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रायोगिक स्तरावर शाडूची माती तसेच मूर्ती घडवण्यासाठी “प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर काही जागा नि:शुल्क स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांना काही प्रमाणात शाडू माती देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
केवळ शाडू माती किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यानेच मूर्ती घडविणारे मूर्तीकार पालिकेतर्फे यंदाच्या वर्षीसाठी प्रायोगिक तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या जागेसाठी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर आजपासून 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपासून सदर प्रक्रिया कार्यान्वित होणार आहे. ही संगणकीय प्रणाली 23 ऑक्टॉबर पर्यंत कार्यरत राहणार आहे.
यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर > For Citizen > Apply > Pandal (Ganpati/Navratri) > Online Murtikar/Stockist Permission या लिंकवर जाऊन 23 ऑक्टोबर पर्यंत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येईल.
याठिकाणी पोलिस, वाहतूक पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या परवानगीचेही अर्ज असल्याने यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसेल. परवानगीसाठी एक हजार रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. मूर्तीकार तसेच मूर्ती साठवणूकदारांना सोबत हमीपत्रही द्यावे लागणार आहे. या हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून संबंधितांच्या स्वाक्षरीसह अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
ML/KA/SL
7 July 2023