चिपळूण मधील चिंचनाका परिसरात मगरीचा मुक्त संचार

 चिपळूण मधील चिंचनाका परिसरात मगरीचा मुक्त संचार

रत्नागिरी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिपळूण मधील चिंचनाका परिसरात रात्रीच्या वेळेस रस्त्यावर मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळेच ही मगर नदी बाहेर येऊन मानवी वस्तीत आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र महाकाय मगरीच्या रस्त्यावरील मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. चिपळूण मधील मगरीच्या मुक्त संचाराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. Free movement of crocodiles in Chinchanaka area in Chiplun

https://youtu.be/OUJTP3pI_HE

ML/ML/PGB
1 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *