या राज्यात ७० लाख विद्यार्थ्यांना दररोज मोफत दूध

जयपूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शालेय विद्यार्थ्यांना पुरेसे पोषण मिळावे यासाठी राज्य सरकारांकडून विविध योजना राबवल्या जातात. राजस्थान सरकारच्या बाल गोपाल योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सरकारी शाळेत शिकणाऱ्या 70 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून दररोज मोफत दूध देण्याचा निर्णय घेतला आहे.
शैक्षणिक दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिवसांत (आठवड्यातील 6 दिवस सोमवार ते शनिवार) मोफत दूध दिले जाईल. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या योजनेसाठी 864 कोटी रुपयांची आर्थिक मंजुर केले आहेत.
राजस्थान शालेय शिक्षण परिषदेचे आयुक्त मोहनलाल यादव यांनी सांगितले की, सरकारी शाळांमध्ये बाल गोपाल योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांना 150 मिली आणि इयत्ता 6 वी ते 8 वीच्या मुलांना 200 मिली दूध दिले जाईल. हे दूध पावडर पासून तयार केले जाणार आहे.
याअंतर्गत राजस्थान को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशनच्या मदतीने शाळांमध्ये दूध पोहोचवले जाणार आहे. या योजनेत दूध वितरणाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल. दुधाची गुणवत्ता फेडरेशन आणि एसएमसी (शाळा व्यवस्थापन समिती) द्वारे तपासली जाईल.
या योजने अंतर्गत आतापर्यंत आठवड्यातून दोनच दिवस दूध दिले जात होते. आता मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात 476.44 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्याचवेळी निवडणुकीच्या वर्षात मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात दुपटीने वाढ करून 864 कोटी रुपये केले आहेत.
SL/KA/SL
10 May 2023