झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मुंबईत १६ हजार लोकांना मोफत घर

 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मुंबईत १६ हजार लोकांना मोफत घर

मुंबई, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण अर्थात SRAच्या सर्व सरकारी यंत्रणांना प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास करण्यात येत आहे. एमएमआरडीएचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ८,४९८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.MMRDAने ४८ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलंआहे. रमाबाई आंबेडकर नगर हे ३१.८२ हेक्टर परिसरात आहे. या प्रकल्पांतर्गत रमाबाई आंबेडकर नगरमधील जवळपास १६ हजार कुटुंबांना मोफत घरं दिली जाणार आहेत.

रमाबाई आंबेडकर नगरातील बहुतांश कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. सुमारे १४,२२४ कुटुंबं पात्र घोषित करण्यात आली आहेत. ईस्टर्न फ्रीवेच्या विस्तारामध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या १,६९४ झोपड्यांची पात्रता यादी आधीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र कुटुंबांना पर्यायी घरांसाठी भाडं देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. एसआरएने ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत जागा रिकामी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून MMRDAला अतिरिक्त ५ हजार घरं विक्रीसाठी मिळणार आहेत. प्रकल्पग्रस्त कुटुंबांना घरं देण्याबरोबरच, MMRDA ५ हजार घरं खुल्या बाजारात विकू शकतं आणि यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

SL/ML/SL
29 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *