केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने फसवणूक, ९९ लाख लुबाडले
पुणे, दि. १२ : पुण्यातील या घटनेने सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका 62 वर्षीय निवृत्त LIC महिला अधिकारीला फसवण्याच्या नादात आणि ‘डिजीटल अरेस्ट’च्या प्रकरणात तब्बल 99 लाख रूपये उकळण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी एक अनोखी शक्कल वापरली आहे. सायबर गुन्हेगार इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी एका केंद्रीय मंत्र्याची खोटी सही करून लाखो रूपये उकळले आहेत.
पुण्यातील एका 62 वर्षीय निवृत्त एलआयसी महिला अधिकाऱ्यांना फसविण्यासाठी आणि “डिजिटल अरेस्ट” घोटाळ्यात त्यांच्याकडून तब्बल 99 लाख रुपये उकळण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी खोटी अटक वॉरंट तयार करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची खोटी स्वाक्षरी केली. पुणे शहर सायबर पोलीसांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका महिलेला “डेटा प्रोटेक्शन एजन्सी”मधील एका टेली कॉलर माणसाचा फोन आला. त्या फोन कॉलवरूनच त्यांची फसवणूक झाली. त्यांच्या आधार कार्डासोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरचा गैरवापर करण्यात आला. त्या मोबाईल नंबरचा काही फ्रॉड ट्रान्जेक्शनसाठी गैरवापर करण्यात आला आहे.
महिलेला असे सांगण्यात आले की, त्यांना त्यांच्या वयामुळे “डिजिटल अटक” अंतर्गत ठेवले जाईल. शिवाय, त्यांच्या प्रत्येक बँक व्यवहारावर लक्ष ठेवले जाईल. सोबतच, बँकेमध्ये असलेले सर्व पैसे पडताळणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बनावट खात्यांमध्ये पैसे पाठवण्यासाठी सांगितले.