राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा २५ जुलैला आझाद मैदानावर धडक मोर्चा !

राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा २५ जुलैला आझाद मैदानावर धडक मोर्चा !
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघातर्फे राज्य शासनास वारंवार निवेदने देऊन आणि सातत्याने पाठपुरावा करुनही, शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे राज्यभरातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील वर्ग-४ कर्मचारी मंगळवार २३ जुलै रोजी मंत्रालय आरसा गेटसहीत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर भोजन सुट्टीमध्ये तीव्र निदर्शने करणार असून, गुरूवार, २५ जुलै रोजी आझाद मैदान येथे राज्यव्यापी धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती .
राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संघटनेचे कार्यध्यक्ष भिकू साळुंखे, सरचिटणीस बाबा कदम,उपाध्यक्ष सुरेश आहेरकर,कोषाध्यक्ष मार्तंड राक्षे आदी उपस्थित होते.
सर्व विभागातील रिक्त पदे कंत्राटी बाह्यस्त्रोताद्वारे न भरता सरळसेवेने भरावीत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पाल्यास शासनसेवेत सामावून घेण्याचा सन १९८१ चा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्निवित करून पूर्वीप्रमाणे पात्ल्यास शासन सेवेत सामावून घावे, अनुकंपा भरती विनाअट करावी, लाड – पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काच्या जागा तात्काळ भराव्यात, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील रुग्णालयातील ७२५ बदली कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करुन त्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार शासनाचे सर्व लाभ मिळावेत, पोलीस कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या कॅशलेस वैद्यकीय सेवाप्रमाणे सर्व विभागातील चतृर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, वर्षानुवर्षे कंत्राटी पध्दतीवर कार्यरत अगलेल्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत कायम करावे, रुग्णालये व महानगरपालिकांमधील सफाई कर्मचाऱ्यांना घाणकाम भत्ता द्यावा, जिल्हा परिषद परिचर वर्ग कर्मचाऱ्यांसाठी ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाचे सुधारीत सेवा प्रवेश निवांमध्ये २५% पदे आरक्षित ठेवावीत , गृह विभागातील १००% रिक्त जागा सरळसेवेने भरण्याचे शासन आदेश असतानासुध्दा, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळामधील वर्ग-४ च्या जागा कंत्राटी पध्दतीने भरण्याचे धोरण स्वीकारले आहे, ते रद्द करावे, राज्य राखीव पोलीस दलातील चतुर्थश्रेणी कर्मचारी (उदा. स्वयंपाकी, सफाईगार, धोबी, न्हावी, शिंपी, चर्मकार इ.) यांना पोलीस जवानांप्रमाणे सर्व सुविधा व साप्ताहिक सुख्यांचा लाभ मिळावा, गट विमा योजनेअंतर्गत सध्या कपात करण्यात येणारी चर्गणी रु.२४०/- ऐवजी सातव्या वेतन आयोगानुसार रु.१०००/ दरमहा कपात करावी, दर दोन वर्षांनी २ गणवेशासाठी मिळत असलेला सिलाईभत्ता रु.७५०/- मध्ये वाढ करुन त्याऐवजी रु.३०००/- शिलाईभता मिळावा. (४) दरमहा निळत असलेला गणवेश धुलाईभत्ता रु. ५०/- मध्ये वाढ करुन त्याऐवजी रु.१०००/- इतका वाढीव गणवेश धुलाईभत्ता लागू करावा. १५) शा.नि.क. इएमटी-१०१४/प्र.क्र. १६९/प्रशा-१. दि. १६ सप्टेंबर, २००५ अन्वये सा.बां.वि.च्च्या अधिपत्याखालील आमदार निवासांमधील ५०८ कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेतल्याने, त्यांनी १६ सप्टेंबर, २००५ ही नियुक्तीची तारीख ग्राय धरून त्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी (GPF) योजना लागू करावी. अशा वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या असून, त्यावर
चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे वेळ मागून ही ते देत नसल्याने अखेर आम्ही आझाद मैदानात आंदोलनाचा निर्धार केला असल्याची माहिती भाऊसाहेब पठाण यांनी दिली.Fourth class employees of the state government strike march on July 25 at Azad Maidan!
ML/ML/PGB
4 July 2024