दूधगंगा धरणातून चार हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

कोल्हापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून सुरू असलेला विसर्ग मध्ये वाढ करण्यात येणार आहे. आज सकाळी 10 वाजता 4000 घनफूट प्रतिसेकंद (क्यूसेक्स) पाणी सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे. आवशकयतेनुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविणेत येणार आहे. दूधगंगा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दूधगंगा धरण व्यवस्थापन यांनी दिला आहे.
ML/ML/SL
26 July 2024