विसर्जनासाठी गेलेले चौघेजण उल्हास नदीत बुडाले…
अलिबाग, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चांदई येथील उल्हास नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जण बुड्याल्याची घटना काल घडली आहे.यामध्ये एका १२ वर्षीय मुलाला वाचवण्यात यश आले तर स्थानिकांनी एकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. बुडालेल्या दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत.
अद्यापही एकजण बेपत्ता आहे.
घटनास्थळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,आमदार महेंद्र थोरवे घटनास्थळी दाखल झाले.
काल रात्री अंधार झाल्याने खोपोली येथील अपघात ग्रस्त सामाजिक टीमने शोध मोहीम थांबवली होती. आज सकाळ पासून शोध मोहीम सुरू केली आहे.
काल सर्वत्र अनंचतुर्दर्शीच्या गणेश बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून गणेश विसर्जना ठिकाणी भक्तांची गर्दी उसळली होती.
कर्जत तालुक्यातील उकल येथील चेतन सोनवणे यांच्या घरी पुणे येथील मित्र जगदीश शाहू आणि त्यांचा मुलगा यश जगदीश शाहू हे आले होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून सोनवणे कुटुंब आणि त्यांचे मित्र शाहू तर इमारतीमधील नागरिक चांदई येथील उल्हासनदीवरील पुलाजवळ गेले होते. गणेश विसर्जन घाट येथे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी पोहचले.
दरम्यान गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी म्हणून चेतन सोनवणे आणि त्यांचे मित्र जगदीश शाहू तसेच मुलगा यश शाहू त्याच सोबत इमारतीतील राहणारा १२ वर्षीय रोहन रंजन हे पाण्यात उतरले होते. गणेश मूर्तीचे विसर्जनादरम्यान चौघेही पाण्याच्या गाळामध्ये अडकले.
यावेळी रोहन रंजन या मुलाला त्याच्या वडिलांनी पाण्यात उडी मारून वाचविले होते. चेतन सोनवणे, जगदीश शाहू आणि मुलगा यश शाहू हे वाहून गेले. उपस्थितांनी आरडाओरड सुरू केला असता स्थानिक तरुणांनी नदीत उडी मारून यश शाहू या मुलाला बाहेर काढले, परंतु यशचा मृत्यू झाल्याचे समजले.
तर चेतन सोनवणे आणि त्यांचे मित्र जगदीश शाहू यांचा शोध घेण्यासाठी खोपोली येथील अपघात ग्रस्त सामाजिक टीमला पाचारण केले होते. अपघात ग्रस्त सामाजिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. घटनास्थळी नागरिकांची पाहण्यासाठी एकाच गर्दी जमली तर यावेळी तहसीलदार,पोलीस उपविभागीय अधिकारी,
कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, उकरूळ-चांदई येथील सरपंच आणि प्रशासन अधिकारी जमले होते.
उल्हास नदीच्या पात्रात बुडालेल्या ठिकाणी अपघात ग्रस्त सामाजिक टीम शोध घेत असताना काल रात्री अंधार खूप झाला होता, तर पाण्याचा सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह देखील वाढल्याने नदीच्या पात्राचा अंदाज घेणे कठिण जात होते. घटनास्थळी कोणतीही विजेची सोय नसल्याने अपुऱ्या साधनांमुळे अपघातात ग्रस्त सामजिक टीम शोध कार्यात अडचण निर्माण होत होती, यामुळे रात्री उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली होती. Four people who went for immersion drowned in Ulhas river…
ML/KA/PGB
29 Sep 2023