पोलिसांच्या चकमकीत चार नक्षल ठार

 पोलिसांच्या चकमकीत चार नक्षल ठार

गडचिरोली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : C ६० पोलीस दल आणि नक्षल मध्ये सकाळच्या सुमारास चकमक उडाली,सुमारे एक ते दीड तास चाललेल्या चकमकीत चार पुरुष नक्षल ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश मिळाले आहे.

चकमकीनंतर पोलिसांनी जंगलात चकमकी ठिकाणी शोध मोहीम शीघ्र करून अधिक तपास केला असता 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून गोळीबाराच्या ठिकाणी 1 एके 47, 1 कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल,तसेच नक्षलांचे साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

ठार करण्यात आलेल्या नक्षल्यांमध्ये
1.) तेलंगणातील डीव्हीसीएम वर्गेश, मांगी इंद्रावेल्ली क्षेत्र समितीचे सचिव आणि कुमुराम भीम मंचेरियल विभागीय समितीचे सदस्यचा समावेश..

2.) DVCM Magtu, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समितीचे सचिव

3.) प्लाटून सदस्य कुरसंग राजू

4.) ⁠प्लाटून सदस्य कुडिमेट्टा व्यंकटेश या चार नक्षल्यांच्या समावेश आहे.

ठार झालेल्या नक्षल्यांवर महाराष्ट्र सरकारने 36 लाखांचे रोख बक्षीस घोषित केले होते.
अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलीस स्टेशन हद्दीपासून पाच किमी अंतरावरील ही घटना आहे. Four naxals killed in police encounter

ML/ML/PGB
19 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *