अमरावती जिल्ह्यात भीषण अपघातात चार मृत्यू …

 अमरावती जिल्ह्यात भीषण अपघातात चार मृत्यू …

अमरावती दि.१८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती नांदगाव खंडेश्वर रोडवर ट्रॅव्हलर आणि सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीनचा आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू, तर 10 गंभीर जखमी झाले आहेत.

क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे 14 तरुण अमरावती वरून यवतमाळ साठी जात असताना नांदगाव खंडेश्वर जवळ शिंगणापूर येथे हा अपघात झाला. जखमीना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले आहे. नांदगाव खंडेश्वर येथे जखमींवर उपचार सुरू असून काही गंभीर जखमींना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर केले आहे.

ML/KA/SL

18 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *