प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या चौकडीला अटक
मुंबई दि.21(एम एमसी न्यूज नेटवर्क): राज्यात गुटखाबंदी जाहीर झाल्यानंतरही शहरासह परिसरात गुटख्याची छुपी विक्री सुरूच आहे. अवैध गुटखाविक्रीला पायबंद घालण्यासाठी मुंबई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी शहरातील बोरीवलीमध्ये छापा टाकला. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने 12 लाख 59 हजार रुपये किमतीचा विमल गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली.
बोरिवली (प.) व्ही पी रोड येथील कृपाल कुटीर सोसायटी, या ठिकाणी काही व्यक्ती हे परराज्यातुन महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मानवी शरीरास अपायकारक असलेल्या व महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असलेला गुटखा स्वतःच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवला आहे,अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत मिळाली होती.
त्यानुसार शहानिशा करुन सदर ठीकाणी पथकाने छापा टाकला . यावेळी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व तत्सम तंबाखूपदार्थांचा साठा व विक्री होत असल्याचे दिसुन आले. पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून 12 लाख 59 हजार रुपये किंमतीचा विमल, रजनीगंधा 5 एचके, सफर, तानसेन, बाबा, तुलसी इत्यादी कंपनीचा प्रतिबंधीत गुटखाजन्य पदार्थ हस्तगत करुन जप्त केला. या प्रकरणी 4 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेवुन त्यास अटक करण्यात आली.
SW/KA/SL
21 Jan. 2023