अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणात चार आरोपींना अटक.
जालना, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केलीये. ऋषिकेश बेदरे, शनिदेव शिरसट,कैलास सुखसे यांच्यासह निलेश बळीराम राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. दगडफेक प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुशंगाने तपास करत असताना गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऋषिकेश बेदरेंसह तीन जण पोलिसांना मिळून आले. Four accused arrested in Antarwali Sarati stone pelting case.
त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आरोपींना अंबड येथील पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता ऋषिकेश बेदरे यांच्याजवळ एक गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसं सापडली आहेत. दरम्यान पोलिसांनी या चारही जणांना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.
ML/KA/PGB
25 Nov 2023