राजकोट किल्ल्यावरील पायाभरणीला 19 फेब्रुवारी पासून सुरुवात
 
					
    सिंधुदुर्ग, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या पायाभरणीचा 19 फेब्रुवारी हा शिवजयंती दिनी शुभारंभ होणार आहे .
हा पूर्णाकृती योद्ध्याच्या वेषभूषेतील ६० फुटी पुतळा येथे उभारण्यात येत आहे. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नवीन पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टील मध्ये बनवण्यात येत आहे. तर चबुतरा आणि पायाच्या कामासाठी एम ५० हे हायग्रीड काँक्रिट वापरण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची क्षमता तपासणी करण्यात येणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या नोयडा येथील कारखान्यात ब्रॉन्झ धातू मधील हा पुतळा बनवला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी या कामाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. १९ फेब्रुवारीला शिवजयंती दिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवपुतळा उभारणी शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
ML/ML/SL
17 Feb. 2025
 
                             
                                     
                                    